मुडलगीच्या खानट्टी-शिवापुर भागात बिबट्या दिसल्याची बातमी पसरली होती . त्यामुळे वनखात्याने सतर्क होऊन बिबट्याच्या शोधासाठी ट्रॅप कॅमेरे लावले होते . मात्र ह्या कॅमेऱ्यात बिबट्या नाही तर रानमांजर कैद झाले आहे .
मूडलगी मध्ये बिबट्या दिसल्याच्या अफवा पसरल्या होत्या . त्यामुळे मूडलगी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून ट्रॅप कॅमेरा बसवला होता जेणेकरून , जर बिबट्या असेल तर त्याचा बंदोबस्त करण्यात येईल . बिबट्याच्या हालचाली शोधण्यासाठी तीन ट्रॅप्स कॅमेरे लावण्यात आले होते . मात्र या मध्ये बिबट्याऐवजी एक छोटे मांजर दिसून आले आहे .
खबरदारीचा उपाय म्हणून खानट्टी-शिवापूर विभागात वनविभागाचे चार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी उसाच्या शेतात बिबट्या दिसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता


Recent Comments