Belagavi

जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनतर्फे एकता श्रेयकरचा सन्मान

Share

बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनची स्केटर्स कु. एकता ज्ञानेश्वर श्रेयकर, ही उच्च शिक्षणासाठी कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथे रवाना झाली आहे. नुकताच तिचा जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनतर्फे गोवावेस स्केटिंग रिंकवर सत्कार करण्यात आला.

ऍपटेक इव्हेनशनचे संचालक विनोद बामणे व ज्योती बामणे यांच्या हस्ते तिला शाल, पुष्पगुच्छ, व स्मतिचिन्ह देवुन सन्मानित करण्यात आले. यावेळी स्केटींग प्रशिशक सूर्यकांत हिंडलगेकर, मंजुनाथ मंडोळकर, स्केटिंगपटू व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Tags: