Belagavi

स्केटिंगपटू खुशी अगसीमणीला 2 रौप्य पदके

Share

बेळगावची उदयोन्मुख स्केटिंगपटू खुशी एकनाथ अगसीमणी हिने कर्नाटक ओपन स्टेट चॅम्पियनशिप 2023 मध्ये भाग घेऊन 2 रौप्य पदके मिळवली आहेत.

बेंगळूर येथे 5 ऑगस्ट 2023 रोजी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये खुशीने कलात्मक स्केटिंग (सोलो आणि फ्री स्टाईल डान्स) मध्ये 2 रौप्य पदके मिळवली आहेत.


बेळगावचे स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विठ्ठल गगणे आणि बंगळुरू येथील पिक्किली करुणाकर नायडू आणि पिक्किली वासुदेव कुमार नायडू यांच्या मार्गदर्शनाखाली ख़ुशी सराव करत आहे.

Tags: