राज्य सरकारने महिला आयपीएस अधिकारी रेणुका सुकुमार यांची हुबळी , धारवाड जिल्ह्याच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्याचा आदेश जारी केला आहे.
हुबळी-धारवाड पोलीस आयुक्तालयाच्या पहिल्या महिला आयुक्त होण्याचा मान त्यांना मिळाला आहे.
प्रभारी आयुक्त म्हणून कार्यरत असलेले संतोष बाबू यांची बदली करण्यात आली आहे.
रेणुका सुकुमार या 2011 च्या बॅचच्या IPS अधिकारी आहेत आणि सध्या त्या होमगार्डच्या डेप्युटी कमांडंट जनरल म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी हुबळी धारवाड पोलीस आयुक्तालयात डीसीपी म्हणूनही काम केले आहे. हुबळी धारवाडच्या इतिहासातील पहिल्या महिला पोलीस आयुक्त म्हणून त्यांची निवड झाली आहे.
डीसीपी असतानाही त्यांनी या दोन्ही शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आता त्या आयुक्त म्हणून आल्याने व्यापारी शहरातील कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात आणावी लागणार आहे.


Recent Comments