KHANAPUR LONDHA BLADE HALLA
पैशाच्या देवघेवीतून ब्लेड हल्ला : लोंढ्यातील दोघे तरुण जखमी
खानापूर तालुक्यातील लोंढा गावात काल सायंकाळी क्रिकेटच्या सट्ट्याच्या पैशाच्या वादातून लोंढा गावातील दोघांवर ब्लेडने वार करून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
या हल्ल्यात लोंढा गावातील रहिवासी अल्तमेश नाईक व इरफान सुभानी हे गंभीर जखमी झाले असून, हल्ला केल्याच्या आरोपावरून बेळगाव येथील आसिफ जमादार व उमर शेख यांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी खानापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, क्रिकेट सट्टेबाजीमध्ये आर्थिक देवाणघेवाण होत असल्याची माहिती आहे.या संदर्भात लोंढा गावातील तरुणाने रक्कम देणे बाकी होते .
याबाबत विचारण्यासाठी बेळगाव येथील तीघेजण लोंढा येथे गेले होते . त्यावेळी वाद होऊन हा ब्लेड हल्ला झाला .
जखमींवर लोंढा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून बेळगाव येथे हलविण्यात आले, अधिक तपास खानापूर पोलीस करत आहेत.
Recent Comments