हेस्कॉमच्या हलगर्जीपणामुळे एका निष्पाप शेतकरी दांपत्याचा बळी गेल्याची संतापजनक घटना बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी गावात घडली आहे.
हेस्कॉमकडुन वीज वितरणातील हलगर्जीपणामुळे बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी गावातल्या तरुण शेतकरी पती-पत्नीचा बळी गेला. शेतात काम करत असताना अचानक वीज तार त्यांच्या अंगावर पडल्याने शॉक लागून या शेतकरी दांपत्याचा जागीच मृत्यू झाला. 32 वर्षाचे अमित देसाई आणि 26 वर्षाच्या लता अमित देसाई असे मृत पती-पत्नीचं नाव असून यांना एक लहान मुलगी आहे. शेतातून जाणार्या 111 केव्ही क्षमतेच्या वीजेच्या तारा अनेक वर्षापासून गंजलेल्या आहेत.
त्या तातडीने बदलाव्यात अशी मागणी गावकर्यांनी वेळोवेळी केली होती. पण हेस्कॉमच्या दुर्लक्षामुळे या धोकादायक तारा अजूनही त्याच स्थितीत आहेत. या कारभाराबद्दल ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या घटनेची पूर्ण चौकशी करून हेस्कॉमकडून आर्थिक मदत त्यांना मिळायला हवी अशी मागणी त्यांनी केली आहे.
Recent Comments