जोल्ले दाम्पत्याने केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेतली. विविध मार्ग सुरू करण्यासाठी आणि ठराविक स्थानकांवर एक्सप्रेस गाड्या थांबण्यासाठी विनंती केले
नवी दिल्ली येथे सन्माननीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांची माजी मंत्री आणि निपाणी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शशिकला जोल्ले आणि चिक्कोडी लोकसभेचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी भेट घेऊन बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेली कराड- निपाणी-बेळगाव या रेल्वे मार्गाचे काम सुरु करून पूर्णत्वाला नेण्याची विनंती केली. हा रेल्वे मार्ग झाला तर कर्नाटक – महाराष्ट्रातील सीमा भागातील लाखो नागरिकांची सोय होणार आहे. त्याच बरोबर खालीलप्रमाणे इतर मार्ग देखील सुरु करावेत अशी विनंती केली आहे.
कराड – निपाणी – बेळगाव (BG)( १९१ कि.मी.)
शेडबाळ – अथणी – विजयपूर (BG)
बेळगाव – कोल्हापूर (BG)
बेळगाव – कित्तूर – धारवाड (BG)
दुहेरीकरण – कॅसल रॉक – कुलें घाट – हसन मंगळुरु रूट
त्याच बरोबर मिरज – बेळगाव मार्गावर चिकोडी लोकसभा मतदार संघात येणाऱ्या काही स्टेशन्सवर खालील एक्सप्रेस ट्रेन्स थांबाव्यात अशी देखील विनंती केली.
हुबळी – दादर एक्सप्रेस (उगार येथे थांबावी)
शरावती एक्सप्रेस व पुडुचेरी एक्सप्रेस ( शेडबाळ येथे थांबावी)
अजमेर एक्सप्रेस व हरिप्रिया एक्सप्रेस (कुडची , रायबाग , चिकोडी रोड स्टेशन येथे थांबावी )
याप्रसंगी महाराष्ट्र भाजप चे उपाध्यक्ष अजित गोपछडे आणि बेळगाव भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष अध्यक्ष संजय पाटील उपस्थित होते.


Recent Comments