Belagavi

जी ए हायस्कूलमध्ये विविध संघांचे उदघाटन

Share

आपल्यातील सुप्त प्रतिभा, कौशल्य विकसित करून जीवनात पुढे या असे आवाहन लिंगराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हनुमंत मेलीनमनी यांनी विध्यार्थ्यांना केले.
बेळगावात केएलई संस्थेच्या गिलगंची अरटाळ संयुक्त पदवीपूर्व कॉलेजच्या हायस्कूल विभागातर्फे आयोजित यंदाच्या शैक्षणिक वर्षातील विविध शालेय संघांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, प्रतिभा आपल्यात आहे. परंतु काही साध्य करू शकत नाहीत. आमच्या सामर्थ्याचा आणि प्रतिभेचा कोणीतरी फायदा घेत आहे. आम्ही पुढे जात नाही. आम्ही मागे पडत आहोत, अशी स्थिती काहींची होते. दुसऱ्याच्या विचाराने जगण्यापेक्षा स्वतःच्या विचारांनी जगण्याची कला शिकली पाहिजे. मग आपण पुढे येऊ शकू. विद्यार्थ्यांनी वक्तशीरपणा अंगीकारावा. अभ्यासाच्या काळात अभ्यासाला जास्तीत जास्त प्राधान्य द्यायला हवे, असे अनेक उदाहरणांद्वारे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. बाईट.
यावेळी उपप्राचार्य एस. आर. गदग यांचे अध्यक्षीय भाषण झाले. यावेळी व्यासपीठावर सांस्कृतिक विभागाचे प्रमुख आर. एम. मगदूम, ज्येष्ठ शिक्षक पी. एस. निडोणी, ए. आर. पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी संपतकुमार पाटील, उषा राठोड उपस्थित होते. अलका पाटील यांनी स्वागत के. आर. पट्टान यांनी परिचय करून दिला. सी. एम. पागद यांनी सूत्रसंचालन केले. एस. के. देसाई यांनी आभार मानले.

Tags: