जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये वापीजवळ आरपीएफ जवान चेतनसिंह याने एक ऑगस्टरोजी 4 जणांची गोळ्या झाडून हत्या केली. त्याबद्दल त्याला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी मुस्लिम समुदायाच्या वतीने बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
रेल्वे सुरक्षा दलाचा जवान चेतनसिंह याने एक ऑगस्ट रोजी वापीजवळ रेल्वेत चौघांवर गोळीबार करून त्यांना ठार केल्याचीघटना घडली होती. चेतनसिंह याने आदिवासी अधिकारी आणि तीन मुस्लिमांना शोधून काढून ठार केल्याचा आरोप करत मुस्लिम, दलित आणि आदिवासी समाजावर सातत्याने होणाऱ्या हल्ल्याचा निषेध बेळगावात आज शुक्रवारी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आला. चेतनसिंह याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. त्याशिवाय काही दिवसांपासून मणिपूर येथे आदिवासी कुकी समाजाच्या लोकांचे शोषण सुरू आहे. महिलांना नग्न करून मारले जाते. माना मेपथ येथे मुस्लिमांच्या घरांवर दगडफेक, जाळपोळही करण्यात आली असून लुटमार सुरू आहे. ते केवळ मुस्लिम, दलित, आदिवासी असल्याने त्यांच्या वेगळ्या विचारसरणीमुळे त्यांचे शोषण आणि अत्याचार होत आहेत. कृपया या सर्व घटनांची दखल घेऊन त्याला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली. फ्लो
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना फजल पठाण यांनी सांगितले की, चेतनसिंह याने आदिवासी आणि मुस्लिमांना जाणूनबुजून शोधून काढून त्यांना सर्व्हिस गनने गोळ्या झाडून ठार मारले आणि भाजप समर्थक आरएसएसच्या घोषणा दिल्या होत्या, असा आरोप केला. या भयंकर घटनेच्या निषेधार्थ त्याला फाशीची शिक्षा द्यावी, या कारणासाठी आम्ही सर्व मुस्लिम संघटनांच्या वतीने त्यांच्यामार्फत आज राष्ट्रपतींना निवेदन देत आहोत.
यावेळी चेतनसिंहला फाशी झालीच पाहिजे या व अन्य घोषणा देण्यात आल्या. निदर्शनात बेळगाव परिसरातील मुस्लिम समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



Recent Comments