Belagavi

बीएससी मॉलकडून वर्धापनदिनानिमित्त डबल डिस्काउंट योजना

Share

दावणगेरे येथील सुप्रसिद्ध विविध प्रकारच्या दर्जेदार, गुणवत्तापूर्ण वस्त्रप्रावरणांचे विक्रेते बी. एस. चन्नबसप्पा अँड कंपनीच्या बेळगावातील बीएससी द टेक्सटाईल मॉलच्या स्थापनेला 1 वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त ग्राहकांना प्रत्येक खरेदीवर 10+10 डिस्काउंट देण्याची योजना कंपनीकडून सुरु करण्यात आली आहे.
बेळगावात आज बीएससी मॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मॉलचे संचालक चंद्रशेखर आणि मृणाल चंद्रशेखर यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, बेळगावात बीएससी द टेक्सटाईल मॉलच्या स्थापनेला यंदा एक वर्ष पूर्ण झाले आहे. केवळ बेळगावचा नव्हे तर संपूर्ण कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यातील दर्जेदार, गुणवत्तापूर्ण वस्त्रप्रावरणांचिरी ही सर्वात भव्य शोरूम आहे. या एक वर्षाच्या काळात तिन्ही राज्यांच्या ग्राहकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद लाभला आहे. शोरुमचा पहिला वर्धापन दिन आणि श्रावण मासानिमित्त आम्ही आमच्या सर्व ग्राहकांसाठी प्रत्येक खरेदीवर 10+10 डबल डिस्काउंट देण्याची योजना सुरु केली आहे. किड्स वेअरपासून ते सर्व वयोगटातील व्यक्तींच्या कपडे खरेदीवर हा डबल डिस्काउंट देण्यात येईल.
यावेळी बोलताना कंपनीचे दुसरे संचालक मृणाल चंद्रशेखर यांनी सांगितले की, खास श्रावण मास आणि पहिल्या वर्धापनदिनानिमित्त डबल डिस्काउंट योजना सुरु केली आहे. श्रावण हा सण-उत्सवांचा महिना, नागपंचमी, वरमहालक्ष्मी, गणेशोत्सव आदी अनेक सणांची या महिन्यात रेलचेल असते. त्यामुळे हमखास घरातील प्रत्येकाला या महिन्यात नवीन कपडे खरेदी केले जातात. त्यामुळेच आम्ही ‘श्रावण आनंद’ या घोषवाक्यासह ही योजना आणली आहे. देशात कुठेही कुठल्याही कपड्यांच्या शोरुमकडून अशी योजना आणली जात नाही. मात्र आम्ही दावणगेरे येथील आमच्या मूळ कंपनीत 1994 पासून ही योजना लागू केली आहे. तीच बेळगावच्या ग्राहकांसाठी येथे लागू केली आहे. अन्य शोरुमकडून स्टॉक क्लिअरन्स सेल वा अन्य योजना लागू केल्या जातात. त्यात 20, 30 अगदी 50 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाते. आमच्याकडेही असे सेल होतात. पण श्रावण संभ्रम ही वेगळ्या प्रकारची सेल योजना आहे. यात ग्राहकांना दररोज नवा स्टॉक खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, बीएससी मॉलतर्फे लवकरच ग्राहकांच्या सोयीसाठी फूडकोर्ट सुरु करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला मॉलचे संचालक वेद चंद्रशेखर तसेच व्यवस्थापक आदी उपस्थित होते. एकंदर, खास श्रावण मासानिमित्त बीएससी द टेक्सटाईल मॉलतर्फे बेळगावकर ग्राहकांना प्रत्येक खरेदीवर 10+10 डबल डिस्काउंट देण्याची योजना सुरु केली आहे. ही ग्राहकांसाठी एक पर्वणीच म्हणावी लागेल.

Tags: