Belagavi

आरएल लॉ कॉलेजतर्फे माजी विध्यार्थी न्यायमूर्तींचा होणार सन्मान

Share

कर्नाटक लॉ सोसायटीच्या वतीने संस्थेच्या राजा लखमगौडा लॉ कॉलेजच्या, कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असलेल्या पाच नामवंत माजी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा येत्या शनिवारी आयोजित करण्यात आला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रसन्ना बी. वराळे यांच्याहस्ते या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
केएलएस संस्थेचे संचालक ऍडव्होकेट आर. एस. मुतालिक यांनी आज बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, हा कार्यक्रम शनिवार, 5 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 4:30 वाजता होणार आहे. कॉलेजच्या प्लॅटिनम ज्युबिली बिल्डिंगमध्ये के.के. वेणुगोपाल सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात ज्येष्ठ वकील आणि संस्थेचे अध्यक्ष अनंत मांडगी हे कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रसन्ना बी. वराळे यांचा सन्मान करणार आहेत.
त्याचप्रमाणे कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रसन्ना बी. वराळे यांच्याहस्ते उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सचिन शंकर मगदूम, न्यायमूर्ती रवि वेंकाप्पा होसमनी, न्यायमूर्ती श्रीमती के. एस. हेमलेखा, न्यायमूर्ती अनिल भीमसेन कट्टी, न्यायमूर्ती रामचंद्र डी. हुद्दार यांचा सत्कार करण्यात येईल. मुख्य न्यायाधीश प्रसन्ना बी. वराळे या कार्यक्रमाला संबोधित करतील. कर्नाटक लॉ सोसायटीचे अध्यक्ष अनंत मंडगी हे समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील. यावेळी कर्नाटक लॉ सोसायटीचे सर्व सदस्य उपस्थित असतील असे ऍडव्होकेट मुतालिक यांनी सांगितले. बाईट.
पत्रकार परिषदेला कर्नाटक लॉ सोसायटीचे अध्यक्ष अनंत मंडगी, सचिव अरुण गणाचारी आदी उपस्थित होते.

Tags: