गेल्या दोन महिन्यांपासून टोमॅटोला चांगला भाव मिळत असून ते शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पीक बनले आहे, मात्र शेतात पिकवलेली टोमॅटो वाहतूक करताना चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
रायबाग तालुक्यातील सिद्धापुर गावातील बुजाप्पा गंगेर याला टोमॅटो चोरल्याचा आरोपावरून , पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. हारुगेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील यलपरट्टी गावातील शेतकरी कुमार गुडोदगी यांनी अर्धा एकर शेतात टोमॅटोचे पीक घेत असून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. दरम्यान, पहाटे शेतात तयार झालेले टोमॅटो चोरीला जात असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.गेल्या पाच दिवसांपासून टोमॅटो चोराला पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या घटनेबाबत बोलताना कुमार गुडोदगी या शेतकऱ्याने सांगितले की, टोमॅटोचे भाव वाढल्याने आमच्या शेतातून मोठ्या प्रमाणावर टोमॅटो चोरीला जात आहेत, या चोराकडून आमचे खूप नुकसान झाले आहे ..पूर्वी आमच्या बागेतून मिरचीची चोरी झाली होती पण कोणीही साक्षीदार नसल्याने आम्ही पोलिसात तक्रार केली नाही.टोमॅटो चोराला पकडण्यासाठी आम्ही पाच-पाच दिवस प्रयत्न केले. रात्री तीनच्या सुमारास एकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
Recent Comments