Belagavi

रेशन कार्ड अपडेट करण्यासाठी नागरिकांची गर्दी

Share

गृहलक्ष्मीसह सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्व प्रकारची रेशनकार्डे ई-केवायसी करून अपडेट करणे आवश्यक केल्याने या कामांसाठी अन्न व नागरी पुरवठा कार्यालयात नागरिकांची एकच झुंबड उडाली आहे. गर्दी टाळून कामे लवकर होण्यासाठी जादा काउंटर सुरु करण्याची मागणी होत आहे.


गृहलक्ष्मीसह विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींची रेशनकार्डे ई-केवायसी करून अपडेट असणे बंधनकारक करण्यात आले आहे. बीपीएल, एपीएल आई अंत्योदय या तिन्ही प्रकारच्या रेशनकार्ड धारकांना गृहलक्ष्मी योजनेचा लाभ देणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. मात्र अनेक कुटुंबांची रेशनकार्डे ई-केवायसी करून अपडेट केलेली नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाखालील अन्न व नागरी पुरवठा कार्यालयात नागरिकांची एकच झुंबड उडाली आहे. या कार्यालयात काउंटर कमी असल्याने कार्ड अपडेट करण्याच्या कामाला विलंब होत आहे, तसेच काही कर्मचारी आपल्या ओळखीच्या लोकांना आत घेऊन त्यांची कामे आधी करून देत असल्याचा आरोपही काही नागरिकांनी केला आहे. कार्ड अपडेट करण्याचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी आणखी काउंटर सुरु करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. फ्लो
यासंदर्भात तक्रार करताना एक एका महिलेने सांगितले की, यापूर्वी मी दोन दिवस कार्ड अपडेटसाठी आले होते. पण गर्दीमुळे माझे कार्ड अपडेट होऊ शकले नाही. सकाळी 11 वाजता नंबर लावला आहे. दोन तास उलटून गेले पण माझा नंबर आलेला नाही. आमचे निळे कार्ड असून, 15 वर्षांपासून त्यावर काहीही मिळालेले नाही. योजनेसाठी कार्ड अपडेट करून घेण्यास आली आहे. पण काम होत नाहीय. येथील काही कर्मचारी आपल्या नातेवाईकांना, ओळखीच्यांना आत घेऊन त्यांची कामे करून देत असल्याचा आरोप या महिलेने केला. आणखी एका व्यक्तीनेही अशाच प्रकारचा आरोप करून कर्मचाऱ्यांना नागरिकांची कामे त्वरित करून देण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी द्यावेत अशी मागणी केली.
दरम्यान अन्य एका नागरिकाने सांगितले की, खूप गर्दी असल्यामुळे कार्ड अपडेट करण्यास विलंब होत आहे. पण काम होत आहे. 2-3 मतदारसंघांतील रेशनकार्डे एकाच ठिकाणी अपडेट करण्यात येत असल्याने गर्दी होऊन विलंब होत आहे. त्यासाठी आणखी जादा काउंटर सुरु करण्याची मागणी त्यांनी केली.
एकंदर, ई-केवायसी करून रेशनकार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया धिम्यागतीने सुरु असल्याने आणखी जादा काउंटर सुरु करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Tags: