केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांच्या 76 व्या वाढदिवसानिमित्त चिक्कोडी येथील केएलई अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात व आजूबाजूच्या टेकड्यांवर 760 रोपे लावण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्राचार्य डॉ. प्रसाद रामपुरे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. प्रसाद रामपुरे म्हणाले की, भावी पिढीला स्वच्छ आणि सुंदर वातावरण देण्याची जबाबदारी आपली आहे. या संदर्भात दरवर्षी डॉ. प्रभाकर कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही झाडे लावत आहोत. आज वनक्षेत्र व डोंगरावर 760 रोपे लावण्यात येणार आहेत असे त्यांनी सांगितले.
शैक्षणिक समन्वयक डॉ. सतीश भोजने, विभागप्रमुख डॉ. संजय पुजारी, प्रा. प्रदीप होडलुर, डॉ. एस. जी. गोल्लगी, डॉ. महांतय्या मठपती व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व 500 हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी केएलई इंडिपेंडंट अंडरग्रेजुएट कॉलेजचे प्राचार्य व्यंकटरेड्डी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनय मनगुळे यांनी केले.
Recent Comments