Belagavi

प्रा . भावना जाधव (बिळगोजी ) यांना पीएचडी पदवी प्रदान

Share

बेळगाव येथील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या २३ व्या दीक्षांत समारंभात , प्रा . भावना जाधव (बिळगोजी )याना राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली .


प्रा . भावना यांनी , व्हुलनरॅबिलिटी ऑफ स्टील स्ट्रक्चर्स टू फायर या विषयावर प्रबंध सादर केला होता . यासाठी त्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली . प्रा . भावना याना बंगळूरच्या आर व्ही इंजिनिअरिंग कॉलेजचे डॉ . रवींद्र आर यांचे मार्गदर्शन लाभले . त्या बेंगळूर येथील रेवा युनिव्हर्सिटी ऑफ इंजिनिअरिंग येथे सिव्हिल विभाग प्रमुख आहेत . त्या हालगा येथील
अभियंता मधुकेश भुजंगराव बिळगोजी यांच्या पत्नी असून , ऍड . भुजंगराव बिळगोजी तसेच जयश्री बिगोजी यांची सून आहे . त्यांच्या या यशाबद्दल भावना यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे .
प्रा . भावना याचा धर्मराज को ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे सत्कार करून अभिनंदन करण्यात आले .

Tags: