बेळगावातील येडियुरप्पा रोडवरील अलारवाड ब्रिजजवळील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना त्रास होत आहे.


येडियुरप्पा रोडवरील अलारवाड ब्रिजजवळील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे येथून येजा करणाऱ्या ट्रक, कार, टू व्हीलर गाड्यांना त्रास होत आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने पादचारी त्यात पडून दुखापत होत आहे. त्याशिवाय वाहनांचेही छोटे-मोठे अपघात व्हायला लागलेले आहेत. महानगरपालिकेने याकडे त्वरित लक्ष देऊन दुरुस्ती करावी अन्यथा नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.


Recent Comments