Belagavi

सत्तेवर आलेल्या दुसर्‍याच दिवशी रस्त्याची डागडुजी:नागरीकातून समाधान

Share

सत्तेवर आलेल्या दुसऱ्याच दिवशी रस्त्याची डागडुजी करण्याचा उपक्रम सुळगा (हिं) ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांनी हाती घेतल्यामुळे नागरिकांतून कौतुक होत आहे.

बेळगाव वेंगुर्ला रस्त्याची खूप दयनीय अवस्था झालेली होती या रस्त्यावर सुळगा आणि उचगाव मथुराजवळ ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले होते त्यामुळे या रस्त्यावरून येजा करताना नागरिकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत होता.
याविषयी प्रशासनाला निवेदन देण्यात मात्र दखल घेतली नाही. मात्र दोन दिवसांपूर्वीच सुळगा हिंडलगा ग्रामपंचायतीचे अध्यक्ष उपाध्यक्ष ची निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीत विजय झालेले ग्रामपंचायत अध्यक्ष रमेश खन्नूकर आणि उपाध्यक्ष भागाण्णा नरोटे यांनी पुढाकार घेऊन या रस्त्याची त्वरित जेसीबीच्या साह्याने डागडुजी करून नागरिकांच्यासाठी रस्ता खुला करून दिला.

या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले होते त्यामुळे किरकोळ अपघाती होत होते त्यामुळे नागरिकांना येजा करताना खूप मोठा त्रास सहन करावा लागत होता बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावर अलीकडे खूप मोठी वाहतूक झाली असून नागरिकांचे खूप मोठ्या प्रमाणात आहे अलीकडे आंबोली धबधबा पाहण्यासाठी नागरिकांची खूप गर्दी झाली आहे त्यामुळे या ठिकाणी अपघाती होत होते मात्र प्रशासनाने याकडे कोणतीच लक्ष दिलेले नाही त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घेऊन या रस्त्याचे काम हाती घेतल्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे यामध्ये ग्रामपंचायत सदस्य यल्लाप्पा कलखांबकर. मारुती पाटील. मल्लाप्पा सुळगेकर. महेश सुतार. आणि शट्टूपा पाटील यांनी पुढाकार घेऊन हे काम हाती घेतले त्यामुळे त्यांचे सर्व नागरिकांतून आणि वाहनचलकातून कौतुक होत आहे

Tags: