बेळगाव तालुक्यातील कुकडोळी गावची महिला तिच्या दोन मुलांसह बेपत्ता झाल्याची फिर्याद हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे.
कुकडोळी गावची 38 वर्षीय महिला कावेरी सातेरी इटगी ही तिची 16 वर्षीय मुलगी सुश्मिता सातेरी इटगी आणि 12 वर्षीय मुलगा मनोहर सातेरी इटगी यांच्यासह 18 जुलैपासून घरातून कोणालाही काहीही न सांगता बेपत्ता झाली आहे. याबाबत महिलेची वृद्ध आई
बाळव्वा रामप्पा बेकवाडकर यांनी हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात दाखल केली आहे. कोणालाही या तिघांबाबत माहिती मिळाल्यास हिरेबागेवाडी पोलिसांशी दूरध्वनी क्र. 0831-2405278, एसीपी बेळगाव ग्रामीण क्र. 08384-226424, 0831-2405280 या क्रमांकाशी संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन हिरेबागेवाडी पोलिसांनी केले आहे.


Recent Comments