बेळगाव जिल्हा फोटोग्राफर्स अँड व्हिडिओग्राफर्स संघटनेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ बसूअण्णा रामण्णावर यांची तर उपाध्यक्षपदी नामदेव कोळेकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्यासह नवीन पदाधिकाऱ्यांचा अधिकारग्रहण समारंभ बेळगावात पार पडला.
बेळगाव जिल्हा संघटनेच्या पदाधिकार्यांचा पदभार सोपवण्याचा कार्यक्रम काल पार पडला. नूतन अध्यक्षपदी बसूअण्णा रामण्णावर, उपाध्यक्ष नामदेव कोळेकर व बी. एस. पाटील, सचिव म्हणून प्रकाश कळसद, सहसचिव म्हणून शेखर लोखंडे, खजिनदार सुरेश मुरकुंबी आणि सह खजिनदार म्हणून अनुरुप नाईक यांची निवड करण्यात आली. सतीश शेट्टी, राजा कट्टी, मोहन कोपर्डे, अमृत चरंतीमठ, अशोक नायक, अशोक श्रीवर्मा, माणिक पवार यांची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली. या नव्य अपदाधिकाऱ्यांचा अधिकारग्रहण बेळगावात पार पडला. सर्व व्हिडिओग्राफर्स आणि छायाचित्रकारांच्या समस्या सोडविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.



Recent Comments