Belagavi

जिपं सीईओ हर्षल भोयर यांचा दलित संघर्ष समितीतर्फे सत्कार

Share

बेळगाव जिल्ह्यातील दलित समाजाशी संबंधित विविध प्रलंबित विकास कामांना चालना दिल्याबद्दल दलित संघर्ष समिती आंबेडकर वाद यांच्यातर्फे जिल्हा पंचायतीचे सीईओ हर्षल भोयर यांचा सत्कार करण्यात आला.

दलित संघर्ष समिती आंबेडकर वादच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच जिल्हा पंचायतीचे सीईओ हर्षल भोयर यांची भेट घेऊन, बेळगाव जिल्ह्यामध्ये दलित समाजाच्या वसाहतीत प्रलंबित कामे पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. ही कामे पूर्ण करण्याबाबत दलित संघटनांनी भोयर यांना विनंती केली होती. त्याची दखल घेऊन त्यांनी अनेक कामांना चालना दिली आहे. त्यानिमित्त आज दलित संघर्ष समिती आंबेडकर वादचे राज्य संचालक सिद्दाप्पा कांबळे, जिल्हाध्यक्ष महांतेश तळवार, मल्लेश चौगुले यांनी जिपं सीईओ हर्षल भोयर यांचा सन्मान केला.

यावेळी बोलताना मल्लेश चौगुले आणि सिद्दाप्पा कांबळे यांनी, अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील दलित वसाहतींमधील विकासकामे प्रलंबित होती, पण जेव्हा आम्ही ही बाब भोयर यांच्या नजरेस आणली, तेंव्हा त्यांनी तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांना निर्देश देऊन ती प्रलंबित कामांना चालना दिली हे कौतुकास्पद आहे असे सांगून तालुक्यांना भेट दिल्यास तेथील दलित वसाहतींना भेट देऊन समस्यांची दखल घेण्याची विनंती केली.
यावेळी रामा चव्हाण, आनंद कोलकार, दीपक दबाडीया, राम मादार, विजय मादार, श्रीकांत चव्हाण, संतोष कांबळे, संतोष तळवार आदी उपस्थित होते.

Tags: