farmers

आलमट्टी धरणात पाण्याची आवक वाढतीच

Share

विजयपूर जिल्ह्यातील आलमट्टी धरणात मोठ्या प्रमाणात पाणी वाहून येतच आहे. सध्या धरणाची पातळी 95.613 टीएमसीवर पोहोचली आहे.
शेजारील महाराष्ट्रात आणि कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस अजूनही सुरूच आहे. त्यामुळे विजयपूर जिल्ह्यातील आलमट्टी धरणात मोठ्या प्रमाणात पाणी वाहून येतच आहे. धरणात आज, रविवारी 1,36,573 क्युसेक्स पाण्याची आवक नोंदवण्यात आली. तर 75,451 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. धरणाची कमाल पाणी साठवण क्षमता: 123.081 टीएमसी आहे. वर्तमान संकलन : 95.613 टीएमसी आहे.

Tags: