बेळगाव महानगर पालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी आज रविवार सुटीच्या दिवशीही शहराचा फेरफटका मारून समस्याग्रस्त भागांची पाहणी केली. खासबाग टीचर्स कॉलनी व परिसराला भेट देऊन तेथील समस्या सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
खासबाग टीचर्स कॉलनी व परिसराला भेट देऊन तेथील समस्या सोडविण्याचे आश्वासन आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी दिले. खासबाग टीचर्स कॉलनी येथे गेल्या पाच वर्षापासून गटार काम व गटारींची सफाई नीट होत नसल्याने सांडपाणी विहिरीत मिसळून रहिवाशांच्या विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. रहिवाशांनी प्रत्येक घरातील सर्व विहिरी स्वच्छ केल्या, तरीही गटारींतील पाणी
विहिरींमध्ये पाझरत आहे. गटार बांधणीचे काम नीट झाले नसल्यामुळे सर्वच गटारांचे सांडपाणी विहिरींत उतरून सर्व लहान मुले आजारी पडत आहेत. ती तातडीने दुरुस्त करण्यासाठी नगरसेवक रवी साळुंके यांनी आज मनपा आयुक्तांना फोनवर कळवले असता, त्यांनी वसाहतीतील लोकांची भेट घेऊन लवकरात लवकर दुरुस्ती करू, असे सांगितले. यावेळी नेगीलयोगी राज्य शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवी पाटील यांनीही कॉलनीतील लोकांच्या व मुलांना कोणतीही अडचण येण्याआधी काम सुरू करावे, अन्यथा कॉलनीतील लोकांच्या वतीने महापालिकेसमोर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी खासबागच्या रविवार आठवडी बाजारालाही भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. या बाजारात 70 ते 80% शेतकरी स्वतः पिकवलेला भाजीपाला आणून विकतात. त्यांच्यासाठी पिण्याचे पाणी आणि ई-टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नगरसेवक रवी साळुंके यांनी केली. त्यावर पुढील रविवारपर्यंत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आयुक्त दुडगुंटी यांनी दिले. फ्लो


Recent Comments