खानापुर-गोवा राज्य महामार्गावरील रुमेवाडी क्रॉसजवळ रस्त्याची अक्षरशः चाळण
झाली आहे . या रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे . रस्त्यांवरील खड्यांमुळे वारंवार अपघात होत आहेत .


गोवा ते बेळगाव आणि हल्याळ ते बेळगाव या दोन गावांना जोडणारा हा मुख्य रस्ता आहे . डझनभर गावांना जोडणारा रस्ता आहे.या रस्त्यावर दररोज प्रत्येक क्षणाला कसरत करून पुढे जावे लागेल अशी परिस्थिती आहे.मात्र संबंधित विभाग मौन पाळत आहे. दररोज लहान मुले व महिलांसह जनतेला या रस्त्यावरून प्रवास म्हणजे नरकयातना भोगाव्या लागत आहेत . सार्वजनिक वाहतूक सुरळीत होण्यासाठी रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी जनतेतून होत आहे. वर्षभरातही या रस्त्यावर अनेक राजकीय घडामोडी घडल्या. गेल्या वेळी राज्यात भाजपचे सरकार होते, फक्त इथले आमदार काँग्रेस पक्षाचे होते ,आता आमदारही भाजपचे, लोकसभा सदस्यही भाजपचे, आणि सरकार काँग्रेस पक्षाचे आहे. या राजकारणाच्या युद्धात केवळ जनता भरडली जात आहे . संबंधित विभागाने याची दखल घेऊन हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी जनतेतून केली जात आहे .


Recent Comments