Belagavi

युवा पिढीमध्ये साहित्यिक मूल्ये रुजवावीत : विध्यावती बजंत्री

Share

कन्नड साहित्याची समृद्ध परंपरा पुढे सुरु ठेवण्यासाठी युवा पिढीमध्ये साहित्यिक मूल्ये रुजविण्याची गरज आहे असे मत कन्नड व संस्कृती खात्याच्या उपसंचालिका विध्यावती बजंत्री यांनी केले.


बेळगावातील कन्नड साहित्य भवनात बेळगाव जिल्हा लेखिका संघाचा वार्षिकोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, नव्या पिढीमध्ये साहित्य-संस्कृतीचे बीजारोपण केल्यास ही परंपरा पुढे नेणे शक्य आहे. त्यामुळे विविध कॉलेजमध्ये साहित्यिक उपक्रमांचे आयोजन करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने बेळगाव जिल्हा लेखिका संघाने पुढाकार घ्यावा. संघाकडून कन्नड साहित्य व संस्कृतीच्या संवर्धनासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची त्यांनी प्रशंसा केली. बाईट. प्रारंभी रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी लेखिका संघाच्या अध्यक्षा जयशीला ब्याकोड होत्या. साहित्यिक आशा कडपट्टी यांनी पुस्तकांचे प्रकाशन केले. निवृत्त प्राचार्या डॉ. गुरुदेवी हुल्लेप्पनवरमठ यांनी पुस्तक परिचय करून दिला. फ्लो
यावेळी जिल्हा लेखिका संघाच्या उपाध्यक्षा डॉ. विजयालक्ष्मी पुट्टी, सचिव डॉ. भारती मठद, खजिनदार प्रतिभा कळ्ळीमठ यांच्यासह संघाच्या पदाधिकारी, सदस्या व साहित्यरसिक उपस्थित होते.

Tags: