बेळगावातील हिंडलगा कारागृहात एका कैद्याने दुसऱ्या कैद्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे.
बेळगावातील हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात दोन कैद्यांमध्ये मारामारी झाली. त्यात एकाने दुसऱ्यावर स्क्रू ड्रायव्हरने वार केल्याची घटना घडली.
बेळगाव येथील हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात दोन कैद्यांमध्ये हाणामारी झाली. हाणामारीत एका कैद्याने दुसऱ्या कैद्याला स्क्रू ड्रायव्हरने पाच वार केले आणि त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. शंकर भजंत्री असे खुनाचा प्रयत्न करणाऱ्या कैद्याचे नाव आहे. यात साईकुमार हा कैदी जखमी झाला असून तो मूळचा मंडयाचा रहिवासी आहे. साईकुमार यांच्या छातीवर, पोटावर आणि कानाला जखमा झाल्या असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. कारागृहात झालेल्या या भांडणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. बेळगाव जिल्हा रुग्णालयासमोर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Recent Comments