Crime

धारवाड पोलिसांनी राऊडी शीटरला केली अटक

Share

हातात हत्यार घेऊन लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या गल्लीबोळात फिरणाऱ्या एका राऊडी शिटरला धारवाड पोलिसांनी अटक केली आहे.धारवाडच्या कुरुबर ओणी येथे भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या सतीश गोकावी (वय 34) याला पोलिसांनी अटक केली असून तोही हद्दपार होता. हद्दपारीची मुदत संपल्याने तो परत आला होता आणि हातात हत्यार घेऊन मद्यधुंद अवस्थेत फिरत होता. त्यामुळे कुरुबर ओणीत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते .पोलिसांनाही याबाबत माहिती देण्यात आली.

मोहरम असल्याने, पोलिसांनी राऊडी शीटर सतीश याला हत्यारासहित अटक केली आहे, . त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

Tags: