बेळगाव शहर व तालुक्यात आज मोहरम सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात श्रद्धा-भक्तिभावाने साजरा करण्यात आला. हिंदू-मुस्लिम बांधवानी सौहार्दपूर्ण वातावरणात जल्लोषात हा सण साजरा केला.


बेळगाव शहरात व परिसरातील ग्रामीण भागात शेकडो वर्षांपासून मोहरम सणाच्या 9 दिवस आधी विविध ठिकाणी पंजे बसविण्यात येतात. दहाव्या दिवशी पंजांची भेट (मुलाकात) कार्यक्रम होतो. तो आज पार पडला. बेळगाव शहर आणि ग्रामीण भागात आज हिंदू-मुस्लिमांनी सौहार्दाने हा सण साजरा केला.
मोहरम सणाच्या दहाव्या मुख्य दिवशी आज सकाळी बेळगाव शहरातील दरबार गल्लीतील शेरखान जामा मस्जिदच्या प्रांगणात पंजांच्या भेटीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी टोपी गल्ली, जालगार गल्ली, रुक्मिणीनगर, कसाई गल्ली, कॅम्प, नागझरी, गांधीनगर, रामतीर्थनगर, अनगोळ, गणेबैल, खानापूर आदी ठिकाणचे पंजे मुलाकात कार्यक्रमासाठी दाखल झाले होते. टोपी गल्ली आणि जालगार गल्लीचे पंजे दाखल होऊन मिलन कार्यक्रम झाल्यावर सर्व पंजे आपापल्या ठिकाणी रवाना होतात. हा कार्यक्रम पाहण्यासाठी विविध जाती-धर्माच्या लोकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. फ्लो.
या संदर्भात इन न्यूजला माहिती देताना इम्तियाज शेख यांनी सांगितले की, बेळगाव शहरात मोहरमनिमित्त अनेक वर्षांपासून दरबार गल्लीतील शेरखान जामा मस्जिदच्या प्रांगणात पंजांच्या भेटीचा कार्यक्रम दरवर्षी पार पडतो. सर्वधर्मीय लोक हा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठी गर्दी करतात. संध्याकाळी ताबूतांची मिरवणूक काढण्यात येते. बाईट.
दरम्यान, पंजे मिलन कार्यक्रम शांततेत व सुरळीत पार पडला. यावेळी परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


Recent Comments