जिल्ह्यातील कित्तूर येथील शहरातील सोन्याच्या दुकानातून चोरी करून फरार झालेल्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
बेळगाव श्रीनगर येथील अबूबकर सिकंदर सनदी (वय २३ ) आणि एका अप्लावयीं मुलाला मुलाला अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून 31 ग्रॅम सोने, 1 किलो चांदी, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि चोरीचे इतर साहित्य जप्त केले.
जुनाटयर सगगरातून शहरातील मानआज्जा ज्वेलर्सचे शटर तोडून आतील 1,82,500 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेण्यात आले होते . याप्रकरणी दुकान मालक सुब्रह्मण्यम पत्तार यांनी फिर्याद दिली होती .
जिल्हा पोलीस प्रमुख डॉ . संजीव पाटील , अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख वेणुगोपाल , तसेच बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक रवी नाईक , यांच्या मार्गदर्शनाखाली कित्तूर सीपीआय महांतेश होस्पेट, पीएसआय प्रवीण गंगोळ आणि त्यांच्या सहकार्यांनी केवळ १२ तासात आरोपींना गजाआड केले .
Recent Comments