Belagavi

माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांची ग्रामवनला भेट

Share

माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी हलकर्णी ग्रामवन केंद्राला भेट देऊन महिलांना गृहलक्ष्मी योजनेच्या प्रमाणपत्रांचे वाटप केले.
खानापूरजवळील हलकर्णी गावाला भेट देऊन कर्नाटक सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्ती योजनेची माजी आमदार व केपीसीसीच्या प्रवक्त्या अंजली निंबाळकर यांनी पाहणी केली. योजनेची प्रगती पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.


यावेळी महिलांना शक्ती योजनेचे प्रमाणपत्र वाटप करून बोलताना त्या म्हणाल्या की, निवडणुकीपूर्वी जाहीर केल्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सर्व गॅरंटी योजना टप्प्याटप्प्याने राबविल्या असून उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आश्वासने पूर्ण केली आहेत. या योजनेच्या नोंदणीसाठी कोणतेही शुल्क नसून मोफत नोंदणी करून सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी महिलांना केले. यावेळी मोठ्या संख्येने महिला व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: