Belagavi

विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचा 23 वा दीक्षांत समारंभ 1 ऑगस्ट रोजी

Share

विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचा 23 वा दीक्षांत समारंभ 1 ऑगस्ट रोजी व्हीटीयूचे डॉ. एपीजे अब्दुल कलाम हॉल येथे होणार आहे. अशी माहिती कुलपती प्रा.एस. विद्याशंकर यांनी दिली .

शुक्रवारी व्हीटीयू सिनेट सभागृहात बोलावलेल्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, आदि चुन्चनगिरी महासंस्थान मठाचे जगद्गुरू , डॉ . श्री निर्मलानंद स्वामीजी, राष्ट्रीय शिक्षा समिती ट्रस्टचे मानद सचिव डॉ. ए, व्ही.एस. मूर्ती आणि म्हैसूर मेक्रान टाइल कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष एच.एन. शेट्टी यांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
बंगळुरूच्या सर.एम.विश्वेश्वराया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा विद्यार्थी मदकशिर चिन्मय विकास याने 13 सुवर्णपदके जिंकली आहेत तर , , बंगळुरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा मेकॅनिकल इंजिनीअरिंगचा विद्यार्थी 7, , सर एम. विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बेंगळुरूचा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा विद्यार्थी गुडिकल साई वंशी याने 7 सुवर्णपदक जिंकली आहेत . बेल्लारी इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजि आणि इलेक्ट्रॉनिक्सचा विद्यार्थी के आर संपतकुमार याने 7 सुवर्णपदके जिंकली आहेत. एकूण 10 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यपाल थावरचंद गेहलोत दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवतील. उच्च शिक्षण मंत्री डॉ. एम.सी.सुधाकर उपस्थित राहणार आहेत. चेन्नई इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासचे संचालक प्रा. व्ही. कामकोटी हे दीक्षांत भाषण करतील, असे ते म्हणाले.

उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी यंदाच्या मे अखेरपर्यंत पदवीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दोन महिने आधीच निकाल जाहीर झाल्याने परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेला असता, असे ते म्हणाले.

भविष्यात गरज पडल्यास व्हीटीयू दरवर्षी दोन्ही दीक्षांत समारंभ आयोजित करण्यास तयार आहे. ते म्हणाले की आंतरराष्ट्रीय कॅलेंडरशी जुळण्यासाठी पीजी प्रवेश परीक्षा आयोजित केली जात आहे.

Tags: