Belagavi

शिक्षकांना सतत 12 महिने निवडणूक ड्युटी लावू नका : प्रशिक्षणावर शिक्षकांचा बहिष्कार

Share

शिक्षकांना सतत 12 महिने निवडणूक ड्युटी लावल्याने सरकारी शाळांतील गोरगरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, त्याशिवाय शिक्षकांना शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याने बीएलओ ड्युटीला शिक्षकांनी विरोध केला आहे. या मागणीसाठी आज मनपाने आयोजित केलेल्या प्रशिक्षणावर शिक्षकांनी बहिष्कार टाकला.
होय, नियमित अध्यापनाची सेवा बजावण्यासह शिक्षकांना शिक्षकांना सतत 12 महिने निवडणूक ड्युटी लावण्यास शिक्षकांनी कडाडून विरोध केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात आज कुमार गंधर्व रंगमंदिरात शहर विभागातील प्राथमिक शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी शिक्षकांनी हा विरोध व्यक्त करून, सतत 12 महिने निवडणूक ड्युटी लावू नये या मागणीचे निवेदन महानगर पालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांना दिले. त्यानंतर प्रशिक्षणावर शिक्षकांनी बहिष्कार टाकला. फ्लो
या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हा शिक्षक संघाचे पदाधिकारी के. एस. राचन्नावर यांनी सांगितले की, गेल्या 15 वर्षांपासून शिक्षकांना बूथ लेव्हल ऑफिसर म्हणून अतिरिक्त ड्युटी लावण्यात येत आहे. सरकार, मनपा आयुक्तांचे आदेश पाळून आम्ही प्रामाणिकपणे ही ड्युटी करत आहोत. मतदार यादीत प्रत्येक नवीन मतदारांची, त्या-त्या परिसरात भाड्याने घर घेऊन राहण्यास आलेल्यांची नोंदणी, तो भाग सोडून गेलेल्यांची नावे वगळणे आदी कामे चोख बजावत आहोत. आता आमच्या शिक्षण खात्यातच मुलांची हजेरी, गळतीबाबत व अन्य विषयांशी संबंधित ऑनलाईन, ऑफलाईन कामे वाढली आहेत. ती कामे करणे, मुलांना दर्जेदार शिक्षण देणे आणि बीएलओ ड्युटी करणे जमत नाही. यापूर्वीच्या 3-4 आयुक्तांनाही यासंदर्भात आम्ही निवेदने देऊन बीएलओ ड्युटीतुन मुक्त करण्याची मागणी केली होती. पण काही उपयोग झालेला नाही. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा मनपा आयुक्तांना व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत. त्यांनी आमची मागणी मान्य न केल्यास राज्य शिक्षक संघटनेच्या सल्ल्याने व शिक्षकांच्या सहमतीने निर्णय घेऊन पुढील कृती करण्यात येईल असे राचन्नावर यांनी सांगितले. बाईट.
बेळगाव शहर शिक्षक संघटनेचे सरचिटणीस रमेश गोणी यांनी सांगितले की, बेळगाव शहरात मंजूर 791 शिक्षक पदांपैकी 690 पदे भरली आहेत. त्यापैकी 300 शिक्षकांना वर्षभर बीएलओ ड्युटी लावण्यात येते. त्यामुळे त्यांना एकाचवेळी अध्यापनाचे दैनंदिन काम आणि ऑनलाईन-ऑफलाईन कामे करणे आणि बीएलओ ड्युटी करणे जमत नाही. सरकारी शाळांत अधिक करून गोरगरिबांची, दलित, मागास मुले शिकतात. अशी कामे लावल्याने त्यांना दर्जेदार शिक्षण देणे शिक्षकांना जमत नाही. त्यामुळे त्यांचा शैक्षणिक हक्क हिरावून घेतला जातो. शिक्षकांना बीएलओ ड्युटी न लावण्याबाबत न्यायालय, सरकार आणिशिक्षण खात्याने यापूर्वी अनेक आदेश जारी केले आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा शिक्षकांना ही ड्युटी लावण्यात येत आहे हे चुकीचे आहे असे त्यांनी सांगितले. बाईट.
दरम्यान, शिक्षकांनी बीएलओ ड्युटीला विरोध व्यक्त करून, सतत 12 महिने निवडणूक ड्युटी लावू नये या मागणीचे निवेदन महानगर पालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांना दिले. त्यानंतर प्रशिक्षणावर शिक्षकांनी बहिष्कार टाकला. फ्लो
यावेळी शहर प्राथमिक शिक्षक संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: