Belagavi

भूतरामनहट्टीत पावसामुळे घर कोसळले; पळ काढल्याने बचावला जीव

Share

बेळगाव परिसरात गेल्या 10-12 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरूच असून त्यामुळे एकच हाहाकार माजला आहे. अनेक घरांत पाणी साचणे, घरांची पडझड होणे असे प्रकार सुरूच आहेत. तालुक्यातील भूतरामनहट्टीत पावसामुळे घराची भिंत, छत कोसळले.


बेळगाव शहरासह ग्रामीण भागात पावसामुळे एकच हाहाकार माजला आहे. झाडे कोसळण्याचे आणि घरांच्या पडझडीचे सत्र सुरूच आहे. तशातच बेळगाव तालुक्यातील भूतरामनहट्टी गावात एक घर कोसळले. यावेळी झालेल्या आवाजाने घरातील सर्व सदस्यांनी तातडीने बाहेर पळ काढल्याने त्यांचा जीव बचावला. पावसाने चिंब भिजलेले हे घर पडल्याने घरातील सदस्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. लक्ष्मी लगमा होंडाई यांच्या घराची समोरची भिंत आधी कोसळली. त्या पाठोपाठ घराचे छतदेखील कोसळले. कुटुंबातील सदस्य घरी असताना हा अपघात झाल्याने त्यांनी बाहेर धाव घेतली आणि त्यांच्या जीवाचा धोका टळला. होंडाई कुटुंब हातावरच्या पोटावरचे व गरीब असून, त्यांना शासनाकडून या घटनेची नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. काकती पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

Tags: