award

त्या कॉन्स्टेबलचा होतोय सगळीकडे सन्मान

Share

किल्ला तलावात बुडणाऱ्या महिलेचे प्राण वाचवणाऱ्या त्या देवदूताचा सन्मान रेणुका देवी ट्रस्ट मंडळाच्या वतीने करण्यात आला. बेळगाव उत्तर रहदारी पोलीस स्थानकाचे पोलीस कॉन्स्टेबल काशिनाथ इरकर यांनी तलावात बुडणाऱ्या महिलेचा जीव वाचवला होता यासाठी ओल्ड पी बी रोड श्री रेणुका देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राहुल मुचंडी, वसंत हलगेकर, चंद्रकांत कामुले, विनोद पुजारी, विनायक सातर्डेकर,सुभाष मजुकर, ओमकार मांगले,आशिष जांगळे ,दिपक नगरकर,सुरज गायकवाड आदी उपस्थित होते

Tags: