गणबैल टोलनाका तत्काळ बंद करून जनतेला दिलासा द्यावा तसेच शेतकरी विरोधी कृतीबद्दल नंदगड मार्केटिंग सोसायटीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी जिल्हाधिकार्यांकडे आवाहन केली आहे.


जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली भुरुणकी ग्राम पंचायतीत झालेल्या बैठकीत माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी नितीश पाटील यांना खानापूर ते बेळगाव या रस्त्याच्या मधोमध नव्याने बांधलेला गणबैल टोल नाका तत्काळ बंद करावा, शेतकरी विरोधी कृतीबद्दल नंदगड मार्केटिंग सोसायटीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. सोसायटीकडून जादा दर आकारून खतांची विक्री करून शेतकऱ्यांना नाडण्यात येत आहे. या दोन्ही बाबींची गांभीर्याने दखल घेऊन तत्काळ कारवाई करावी असे त्यांनी सांगितले.


Recent Comments