राज्यातील काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजप आणि जेडीएस करत असल्याच्या चर्चेने राज्याच्या राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि जेडीएस पक्षांच्या जाळ्यात काँग्रेसचे आमदार अडकणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक आहे असे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी म्हटले आहे.

हुक्केरी शहरात आज प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, जेडीएस नेते कुमारस्वामी परदेशात बसून राजकीय जाळे टाकत आहेत, भाजपप्रमाणेच काँग्रेस पक्षाच्या आमदारांसाठी समुद्रात मासेमारी करत आहेत, मात्र त्यांच्या गळाला कोण लागू नयेत यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. काँग्रेस नेत्यांनी सावधगिरी बाळगून आमच्या आमदारांना एकसंघ ठेवले पाहिजे. बाईट.
त्यानंतर हुक्केरी तालुक्यातील विविध विभागांच्या प्रगतीबाबत मंत्री जारकीहोळी यांनी बैठक घेतली. पावसाळ्यात पिण्याच्या शुध्द पाण्याची व्यवस्था तसेच पूरप्रवण भागात खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी बेळगाव जिल्हा पंचायतीचे उपसचिव बसवराज हेग्गनायक, तहसीलदार संजय इंगळे, पोलीस निरीक्षक रमेश छायागोळ व अन्य अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीला हुक्केरी तालुक्यातील विविध गावातील नेते व अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments