Crime

मणिपूरमधील ख्रिश्चनांना संरक्षण देण्याच्या मागणीसाठी हुबळीत मोर्चा

Share

मणिपूर राज्यातील ख्रिश्चनांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असल्याने सरकारने त्यांना संरक्षण व सुरक्षा पुरवावी, या मागणीसाठी धारवाड जिल्हा युनायटेड ख्रिश्चन पास्टर्स अँड लीडर्स अलायन्सतर्फे शहरात मोर्चा काढून जोरदार निदर्शने करण्यात आली.हुबळीतील आंबेडकर सर्कल येथून महानगरपालिका रोडमार्गे हुबळी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तेथे सरकारच्या नावाचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.


मणिपूरमधील बलात्कार आणि हिंसाचाराच्या घटनेबाबत तेथील राज्य सरकार किंवा केंद्र सरकार योग्य ती कायदेशीर कारवाई का करत नाही? महिलांवरील गुन्हे थांबले पाहिजेत. ख्रिश्चनांवर झालेला हल्ला निषेधार्ह असून मणिपूर येथील घटनेचा संपूर्ण देश निषेध करतो. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ख्रिश्चनांना पुरेशी सुरक्षा देण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी हूबळी-धारवाड महापालिकेचे नगरसेवक दोराज मन्नेकुंतला, सुधा मन्नेकुंतला, नेते सुनील महादे, ख्रिश्चन समाजाचे जिल्हाध्यक्ष शेड्राक यांच्यासह अनेक ख्रिश्चन समाज बांधव सहभागी झाले होते.

Tags: