देशाच्या रक्षणासाठी युवा पिढीने सैन्यदलात भरती व्हावे असे आवाहन तोराळी कोब्रा कमांडो कॅम्पचे डीआयजीपी ए. एम. रवींद्रन यांनी केले.
आज २६ जुलै कारगिल विजय दिवसानिमित्त माजी सैनिक संघटना आणि डॉ. रवी पाटील विजया ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटरच्या वतीने रामतीर्थ नगरमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना तोराळी कोब्रा कमांडो कॅम्पचे डीआयजीपी ए. एम. रवींद्रन म्हणाले की, पूर्वी सैन्यात दहावी पास-नापासांनाही भरती करून घेतले जायचे. मात्र आता पदवीधर युवकही सैन्यात भरतीसाठी मोठ्या प्रमाणात येत आहेत. देशाविषयी युवा पिढीने नेहमी प्रेम, अभिमान बाळगला पाहिजे. सैन्यात अनेक संधी आहेत. त्यांचा लाभ घेऊन युवकांनी देशसेवेसाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले. बाईट.
यावेळी बोलताना डॉक्टर रवी पाटील म्हणाले की, सैनिकांमुळे आपण देशात सुरक्षित राहतो. त्यामुळे देवाबरोबरच आपण सैनिकांचीही पूजा केली पाहिजे. आज आम्ही विजया ऑर्थो हॉस्पिटल अँड ट्रॉमा सेंटरतर्फे २०० निवृत्त जवानांचा सन्मान करून त्यांच्यासाठी विशेष आरोग्य योजना लागू केली आहे. भविष्यातही सैनिकांच्या सेवेसाठी आम्ही प्रयत्नरत राहू असे त्यांनी सांगितले. बाईट.
प्रारंभी कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या स्मारकाला पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माळमारुती पोलीस स्थानकाचे सीपीआय सुनील पाटील, भारतीय कृषक समाजाचे राज्याध्यक्ष सिदगौडा मोदगी, नगरसेवक हणमंत कोंगाळी, डॉक्टर सोमशेखर पाटील आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन कऱण्यात आले. फ्लो
यावेळी डॉक्टर रवी पाटील यांच्याहस्ते निवृत्त जवानांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्यासाठी विशेष आरोग्य योजनाही त्यांनी घोषित केली. फ्लो
यावेळी रामतीर्थनगर माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belagavi
विजया हॉस्पिटल-माजी सैनिक संघटनेतर्फे कारगिल विजयदिन


Recent Comments