Belagavi

जायंट्स मेनच्या वतीने रहदारी नियंत्रण सूचना फलक

Share

ज्या मार्गावर दुहेरी वाहतूक आहे त्याठिकाणी अनेकदा वाहनचालकांच्या चुकीमुळे वाहतूक कोंडी होत असते आणि यामुळे अनेकांना तासनतास अडकून पडावे लागते यासाठी प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन केल्यास वाहतूक सुरळीतपणे होईल असे उद्गार जायंट्स मेनचे अध्यक्ष सुनिल मूतगेकर यांनी काढले.

जायंट्स मेनच्या वतीने याबाबत जागृती करण्यासाठी दुसरे रेल्वेगेट तसेच कपिलेश्वर उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला जागृती फलक लावण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.
बेळगाव शहरात अनेक ठिकाणी वाहनधारक चुकीच्या पद्धतीने वाहन चालवत असल्याने त्यांच्यात जागृती व्हावी या उद्देशाने हे फलक लावले असल्याचे सचिव लक्ष्मण शिंदे यांनी सांगितले.

वाहनधारकांनी रस्त्यावरून जाताना एका बाजूने जाऊन शिस्त पाळावी असा संदेश यामधून देण्यात आला आहे.
हे फलक तयार करण्यासाठी उपाध्यक्ष अविनाश पाटील आणि सुनिल चौगुले यांनी आर्थिक सहकार्य केले.
यावेळी माजी अध्यक्ष मदन बामणे,सुनील भोसले,विकास कलघटगी,खजिनदार विजय बनसुर, पांडुरंग पालेकर,महेश रेडेकर,उपाध्यक्ष अरुण काळे,पुंडलिक पावशे, सुनील पवार, मुकुंद महागावकर,आनंद कुलकर्णी,प्रकाश तांजी अजित कोकणे विश्वास पवार संभाजी देसाई, राहुल बेलवलकर आदी उ उपस्थित होते .

त्याचप्रमाणे , किल्ला तलावात आत्महत्या करण्यासाठी उडी घेतलेल्या एका महिलेचे प्राण वाचविलेल्या वाहतूक विभागातील पोलिस कर्मचारी काशिनाथ इरगार यांना अध्यक्ष सुनिल मुतगेकर यांच्याहस्ते शाल स्मृतिचिन्ह व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष सुनिल मुतगेकर व माजी अध्यक्ष शिवकुमार हिरेमठ यांनी इरगार यांच्या धाडसी कार्याचा गुणगौरव केला.

उपस्थित साऱ्याच सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Tags: