Banglore

पाहू विरोधक कितपत काय करतात ते! डीकेशिनी उडवली विरोधकांची खिल्ली

Share

सरकार पाडण्यासाठी विरोधक सिंगापूरमध्ये जाऊन षडयंत्र रचत आहेत, त्याची माहिती आम्हाला आहे, पाहू कितपत काय करतात ते अशा शब्दांत उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी विरोधकांची खिल्ली उडवली.
राज्यातील काँग्रेस सरकार पाडण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि जेडीएस देव पाण्यात घालून बसलले आहेत अशा वावड्या राज्याच्या राजकारणात उठत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आज विरोधकांची खिल्ली उडवली. ‘भाजप-जेडीएस हे दोन्ही विरोधी पक्ष काँग्रेस सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याबाबत आम्हालाही काही माहिती मिळाली आहे. याबाबत बेंगळूरमध्ये खलबते केली तर ती सगळ्यांना समजतील या भीतीने ते सिंगापूरमध्ये जाऊन षडयंत्र रचत आहेत. पाहुयात ते कितपत काय करतात ते’ अशा शब्दांत डीकेशिनी विरोधकांची खिल्ली उडवली. बाईट.
एकंदर, भाजपने जेडीएसच्या मदतीने महाराष्ट्र पॅटर्न वापरून राज्यातील काँग्रेस सरकार अस्थिर करून ते पाडण्याचा प्रयत्न चालविल्याच्या वृत्ताला खुद्द उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनीच दुजोरा देत, पाहुयात विरोधक काय करतात ते असे ठामपणे सांगत, भाजपच्या प्रयत्नांना यश येणार नाही असे आत्मविश्वासपूर्वक सांगितले आहे. आता भाजपच्या प्रयत्नांना यश येणार का भाजप यात तोंडावर आपटणार हे येणार काळच सांगू शकेल एवढे मात्र खरे.

Tags: