सततच्या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले असून ते दुरुस्त करण्याचे काम हाती घेतलेल्या पोलिस अधिकाऱ्यांमुळे वाहतूक सुरळीत झाली असून, ‘पोलीस हे आमचे रक्षक’ अशा शब्दात नागरिकांनी कौतुकाचा वर्षाव केला.

व्हॉइस ओव्हर : शहरातील गोकुळ रोडवरील होसूर डेपोसमोरील सुचिरायू हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यावरून हजारो वाहनांची वर्दळ असते . या संदर्भात आज सकाळी येथे ड्युटीवर आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहनधारकांचे या खड्डेमय रस्त्यावरून जाताना होणारे हाल पाहून , पाहून स्वत:हून ते खड्डे बजावल्याचे दृश्य नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले आहे.
हुबळी धारवाड या शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर खड्डे पडले आहेत , हुबळी धारवाड महानगर पालिका किंवा संबंधित अधिकारी या रस्त्याशी आमचा काहीही संबंध नाही अशी बेफिकीर वृत्ती दाखवत आहेत. आपल्या व्यस्त कामातही पोलिसांनी रस्त्यांवरील खड्डे बुजवून जनतेची मर्जी जिंकली आहे.


Recent Comments