हुक्केरी तालुक्यातील कोटबागी ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी बसवराज लगमप्पा बुसरी व सोनव्वा लगमप्पा चंदरगी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सोमवारी झालेल्या निवडणूक प्रक्रियेत अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी बुसरी व चंदरगी यांचे एकमेव उमेदवारी अर्ज सादर केल्याने निवडणूक अधिकारी एच. ए. माहुत यांनी त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली.
नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचे ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व चाहत्यांनी सत्कार करून अभिनंदन केले.
पत्रकारांशी संवाद साधताना नूतन अध्यक्ष बसवराज बुसरी यांनी कोटबागी ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी आपली बिनविरोध निवड करण्यात मदत करणाऱ्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केले.
यावेळी पंचायत विकास अधिकारी निरंजन कुरबेट, सचिव सुरेश गस्ती, शिवा नायक व कोटबागी ग्रामस्थ उपस्थित होते.



Recent Comments