बेक्किनकेरे ग्राम पंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज पार पडली. अध्यक्षपदी सौ. छगुबाई शंकर कांबळे व उपाध्यक्षपदी सौ. लक्ष्मी सोमनाथ सावंत यांची निवड झाली आहे. या विजयाने ग्राम पंचायतीवरील भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी भाजप बेळगाव ग्रामीण मंडळच्या विजय नगर येथील कार्यालयास सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी भाजप बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांनी अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा शाल व हार घालून सत्कार केला व पुढील राजकीय वाटचालीला शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही राजकीय दडपणाला व आमिषाला बळी न पडता बेक्किनकेरे ग्राम पंचायत हा बालेकिल्ला भाजपाने अबाधित ठेवल्याबद्दल सर्व ग्राम पंचायत सदस्य व कार्यकर्त्यांचे आभार मानले. या प्रसंगी बेक्किनकेरे ग्राम पंचायत सदस्य, प्रमुख कार्यकर्ते तसेच यल्लपा गावडे,
अर्जुन डोंबले, सुरेश सावंत, परशुराम भातकांडे, गंगाराम कृष्णा सावंत, गंगुबाई गावडे, अजित हलकर्णी, विलास तशीलदार, गुरुराज हलगत्ती, मंथन सुतार, भाग्यश्री कोकितकर, लक्ष्मी परमेकर, लता उसुलकर, आदीसह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments