मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे , मराठा समाजातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ पार पडला .
रविवारी बेळगाव येथील श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन (ओरिएंटल हायस्कूल) येथे आयोजित केलेला हा कार्यक्रम प्रकाश मरगाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला .
प्रमुख पाहुणे म्हणून राणी चन्नमा विद्यापीठाचे भाषा विभागाचे निवृत्त डीन डॉ. विनोद गायकवाड उपस्थित होते . त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केलेल्या या सत्कार समारंभाचे कौतुक केले . यावेळी सत्कार समारंभासाठी
मुलींची जास्त संख्या पाहून त्यांना जिजाबाईच्या लेकी असे संबोधले . तुमच्यावर समाजाची मोठी जबाबदारी आहे . विद्यार्थ्याना देण्यात येणारी स्मृतिचिन्हे ही सेवा चिन्हे आहेत . या मंडळाचे ” सुधारणा ” हे एकमेव ध्येय आहे . असे सांगून त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी उद्योजक विजय कंग्राळकर , राजीव साळुंखे, . संग्राम गोडसे दिपक किल्लेकर ,
रेणुका मोहन सप्रे , शिवराज पाटील , जी. जी. कानडीकर तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते


Recent Comments