बेळगावात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नाले-गटारी ओसंडून वाहात आहेत. या पार्श्वभूमीवर महापौर शोभा सोमनाचे आणि उपमहापौर रेश्मा पाटील यांनी आज अधिकाऱ्यांसह विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. तातडीने सर्वेक्षण करून तुंबलेले नाले-गटारी साफ करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
गेल्या सुमारे ८ दिवसांपासून बेळगाव परिसरात मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे शहराच्या सखल भागात व अन्यत्र देखील नाले व गटारी भरून वाहत आहेत. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्याच्या आणि नागरिकांना त्रास होऊ नये या हेतूने महापौर शोभा सोमनाचे आणि उपमहापौर रेश्मा पाटील, नगरसेवक बाबाजान मतवाले, नगरसेविका रेश्मा बैरकदार यांनी आज अधिकाऱ्यांसह शहर व उपनगरातील विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. तातडीने सर्वेक्षण करून तुंबलेले नाले-गटारी साफ करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

महापौर सोमनाचे उपमहापौर पाटील आणि नगरसेवक बाबाजान मतवाले यांनी अधिकाऱ्यांसमवेत माळमारुती वसाहत, बुडा ऑफिसमागील आसदखान कॉलनी, शिवाजीनगर, शाहूनगर शेवटचा बसस्टॉप आदी भागांना भेट देऊन नाले व गटारींची पाहणी केली. सांडपाण्याचा निचरा नीट व्हावा, पाणी साचून वसाहतींत शिरून लोकांना त्रास होऊ नये याची दक्षता घेऊन उपाययोजना करा, तुंबलेल्या गटारींचे सर्वेक्षण करून त्या तातडीने साफ करा अशा सूचना त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी बोलताना शाहुनगरच्या स्थानिक रहिवाशांनी महापौर व उपमहापौरांनी रविवार सुटीच्या दिवशीही पावसाच्या पाण्यामुळे गटारी व अन्य समस्यांची पाहणी केल्याबद्दल समाधान व्यक्त करून लवकरात लवकर नागरी समस्या सोडविण्याचे आवाहन केले.

यावेळी नगरसेवक राजशेखर डोनी, रेश्मा बैरकदार, बाबाजान मतवाले, प्रवीण पाटील, रवी बागी, शंकर चोरगे आणि पालिका अधिकारी आदी उपस्थित होते.


Recent Comments