बेळगावच्या किल्ला तलावात महिला बुडताना दिसताच उत्तर वाहतूक पोलीस स्टेशनचे कर्मचारी काशिनाथ इरगार यांनी क्षणाचाही विचार न करता तलावात उडी मारून महिलेचे प्राण वाचवले. माजी आमदार तसेच भाजप महानगर जिल्हाध्यक्ष अनिल बेनके यांनी काशिनाथ इरगार यांच्या धाडसाचे कौतुक करून , त्यांचा सत्कार केला .
शनिवारी कौटुंबिक कलहातून बेळगावच्या किल्ला तलावात उडी मारून एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला . त्या महिलेला बुडताना पाहताच ,तिथे ड्युटीवर असलेल्या काशिनाथ इरगार या रहदारी पोलिसाने क्षणाचाही विलंब न करता , तलावात उडी मारून त्या महिलेला वाचवले .
कर्मचार्यांच्या वक्तशीरपणामुळे सार्वजनिक क्षेत्रात विभागाची प्रतिष्ठा वाढली असून, माननीय पोलिस आयुक्तांनी या प्रशंसनीय कार्याचे कौतुक करून रोख बक्षीस जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे , बेळगावचे माजी आमदार तसेच बेळगाव भाजप महानगर जिल्हाध्यक्ष अनिल बेनके यांनी देखील या धाडसी रहदारी पोलिसाचा सत्कार करून , त्याचे कौतुक केले .


Recent Comments