महाराष्ट्रातील कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे.त्यामुळे कृष्णा,वेदगंगा आणि दूधगंगा नद्या दुथडी भरून वाहत आहेत.निप्पाणी तालुक्यातील कारदगा गावातील दूधगंगा नदीच्या पाण्याने बंगाली बाबा दर्ग्याला वेढा पडला आहे.

महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात पावसाची संततधार सुरू आहे गेल्या सहा दिवसांपासून बेळगावातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा या नद्या धोक्याच्या पातळीवर आहेत . दूधगंगा नदीचे पाणी वाढल्याने , कारदगा गावाच्या बाहेरील बंगाली बाबा दर्गा जलमय झाला आहे . बेळगाव जिल्ह्यातील निप्पाणी तालुक्यातील कारदगा गावचा
बंगाली बाबांचा दर्गा, हिंदू-मुस्लिम अध्यात्माचे प्रतीक असून , हा दर्गा दूधगंगा नदीच्या पाण्याने वेढला गेला आहे .
बेळगाव पोलिसांनी पाण्याने वेढलेल्या या दर्ग्यात प्रवेश बंदी घातली आहे.
नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे .


Recent Comments