न्यायालयाने काशी विश्वनाथ मशीद वादानंतर मशिदीचे ज्ञानव्यापी मशिदीचे सर्वेक्षण करण्यास परवानगी दिली हे स्वागतार्ह आहे अशा शब्दांत श्री राम सेना प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
धारवाड येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना मुतालिक म्हणाले की, हे प्रकरण गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून, तेथील महिला परिषदेच्या सदस्यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन मूर्तीपूजेची परवानगी मागितली होती, त्यानंतर जिल्हाधिकार्यांनी परवानगी दिल्यानंतर मुस्लीम नेते न्यायालयात गेले, आता न्यायालयाने सर्वेक्षण करण्याची परवानगी दिली आहे, ही स्वागतार्ह बाब आहे.
या मशिदीत गौरी, गणपती आदी हिंदू देवतांच्या मूर्ती आहेत. मुस्लिमांनी हिंदूंना या मशिदीत हिंदू देवतांच्या मूर्तीची पूजा करण्याची परवानगी द्यायला हवी होती, पण ते घमेंडीने, हटवादीपणाने कोर्टात गेले. मात्र न्यायालयाने आता न्याय दिला आहे असे मुतालिक यांनी सांगितले.


Recent Comments