Bailahongala

बुदरकट्टीत घर कोसळून एकाच कुटुंबातील 13 जण गंभीर जखमी

Share

बेळगाव जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आता घरांच्या पडझडीला सुरवात झाली आहे. जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील बुदरकट्टी गावात घर कोसळून एकाच कुटुंबातील 13 जण गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना घडली आहे.


बुदरकट्टी गावातील एकाच कुटुंबातील 13 जण घराचे छत व भिंत कोसळल्याने गंभीर जखमी झाले आहेत. गेल्या चार ते पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे गावातील घर कोसळले. टीव्ही पाहत बसलेल्या कुटुंबीयांवर छत कोसळल्याने 13 जण गंभीर जखमी झाले.
इरम्मा पत्रेप्पनावर, सुमंता पत्रेप्पनावर, बसवानप्पा तडकोड, शंकरप्पा पत्रेप्पनावर, विनायक पत्रेप्पनावर, पारव्वा पत्रेप्पनावर यांच्यासह 13 जण जखमी झाले. पावसामुळे भिजलेली भिंत त्यांच्या अंगावर कोसळली.
भिंतीत अडकलेले लोक जीव मुठीत घेऊन बचावले. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बैलहोंगलचे प्रांताधिकारी, तालुका पंचायतीचे मुख्याधिकारी सुभाष संपगनवी, पीडीओ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दोड्डवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

Tags: