Belagavi

खानापूर तालुक्यातील शाळांना शनिवारी 22 जुलै सुट्टी

Share

खानापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे शनिवारी 22 जुलै  खानापूर तालुक्यातील प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांना एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.

खानापूर तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेसाठी शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले की, खानापूर तालुक्यातील चिखले,

पारवाड व चिगुळेसह खानापूर तालुक्यातील इतर सर्व धबधब्यांना भेटी देण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ते म्हणाले की, जनतेच्या सुरक्षेसाठी इतर धबधब्यांना भेटींवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

Tags: