Education

सुरळीत बस सेवेसाठी विद्यार्थ्यांचे पावसात बस रोखून आंदोलन

Share

बसभावी शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने , विद्यार्थ्यांनी , बस रोखून , पावसात आंदोलन छेडले .


विजापूर जिल्ह्यातील निडगुंदी तालुक्यातील आरेशंकर क्रॉसजवळ ही घटना घडली. बिदनाळ , राजनाळ, आरेशंकर गावातील विद्यार्थ्यांनी बसवन बागेवाडी येथून निडगुंदी मार्गावरील प्रवासी बस थांबवून आंदोलन केले. मुसळधार पावसात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर काटेरी झाडे आणि दगड टाकून रस्ता बंद करून आंदोलन केले, परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत, आमच्या गावाला शासकीय बससेवा देण्यात यावी, अशी मागणी केली. याबाबत आम्ही परिवहन विभाग व इतर विभागाच्या अधिकाऱ्यांना यापूर्वीही आवाहन केले आहे, मात्र आवाहन करूनही आमचा प्रश्न सुटला नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.
बससेवा देण्याच्या मागणीसाठी बसवन बागेवाडी निडगुंदी मार्गावर बस रोखून धरून आंदोलन करण्यात आले . काही पालकांनीही विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. बसवनबागेवाडी आगाराच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली व बससेवा देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांच्या विनंतीला प्रतिसाद देत आंदोलन मागे घेतले.आंदोलनामुळे गेल्या तीन तासांपासून बंद असलेली बस वाहतूक पुन्हा सुरू झाली.

Tags: